शब्द
शब्द
शरीराचा जखमा भरून जातात
पण शब्दाचं मार मनावर
घाव करून जातो।
शब्द करतात कधी-कधी निःशब्द
शब्द समजला तर अर्थ
नाही समजला तर कलह
शब्दा शब्दाने कधी वाढतो गोडवा
तर शब्दांनी कधी येतो नात्यात दुरावा
शब्दांनी घडले महाभारत
तर शब्दांनी रचले रामायण
शब्द चाले शस्त्रा समान
नाही रक्त पण व्हाते अश्रुंचे बांध
बोलेला शब्द नाही घेता येत परत
म्हणून असावी लगाम ह्या जिभेला
सांडलं ते भरता नाही येतं
तसच काहीस ह्या शब्दांचं
शब्द म्हणजे स्नेह प्रेम
शब्द म्हणजे मनातला द्वेष
शब्द म्हणजे विचारांची सुंदरता
शब्द म्हणजे मायेचं वातसल्यं
शब्द म्हणजे अमृताचा झरा
शब्द म्हणजे जगण्याची नवी आशा
शब्द म्हणजे जीवनाचे सार्थ
शब्द म्हणजे उत्सहाच प्रवास
शब्द म्हणजे आत्मविश्वास।।
