STORYMIRROR

Dr.Manda Jadhav

Tragedy

2  

Dr.Manda Jadhav

Tragedy

कोविड-19

कोविड-19

1 min
3.1K

जगत होते सगळेच होऊन बेभान

आला मग एक विषाणू मांडून ठेवले थैमान


नको वाटला मग पैसा,

नको वाटली प्रसिद्धी,


वाटला जीव मोलाचा, 

ओढ लागली मग घराची।


केले हतबल एक विषाणूनी।

मग शोधू लागलो पळवाटा भीतीनी

देवालासुद्धा देवळात बंद केले

बंद झाले सगळे दारे, सारेच रस्ते


बंधनकारक केले घरात राहणं

आमचा जीव वाचवण्यासाठीच

तरी आमच्या जीवाला चैन पडेना


चाहूल लागली नुसती बाहेर जाण्याची

मग आता साथ तरी कोणाची?


मदतीला आले तेच ज्यांना,

आम्हीच दगडाने ठासले


सफेद कोटातला अन वर्दीतला माणूस,

आज देवमाणूस जणू वाटला


जागी झाली आज माणुसकी

माणूस पुन्हा संवेदनशील झाला...

हे सगळं घडवलं ते एका विषाणूनी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy