आराधना
आराधना
आई भवानी कृपा असू दे
करते चरणी एक आर्जव
भाव भक्ती ची हाक दिली
माऊली येशील का धावून
ललिता पंचमी असे औचित्य
आरास दिसे नभरंगी शोभून
आराधना तुझी कराया आणुन
फुल नील कमल रंगी शोधून
आराध्य तू माता माऊली
मागण एकच मागते आई
देई ठाव मला तुझ्या चरणी
नको अंतर कधी ही देऊ
तुझ्या पुजेला सान थोर
जमली सारे भक्त जन
हळदीकुंकु हार फुल वेणी
खान नारळ ओटी भरून
सत्वर घेई भाक आई तुझी
राखीन वसा मी जीवनी
तुझ्या रुपाला तुझ्या वचनाला
नकोस कधी देऊ भुल पडून
आराधना तुझी भाव भक्तीने
आज करते माय माऊली
करुन सार्थक मला जीवनी
संकट हरशी देशी सावली
