आपली माती.....
आपली माती.....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आपली माती कस परिधान
जिव्हाळा नि ममतेचा करून,
पाहू थोडे मायेच्या निराकार
आपल्या माणसांत राहून....
कितीही केली दुनियादारी तरी
सर कशालाच यायची नाही,
आपली माती आपली माणसं
काही केल्या विसरायची नाही..
वाऱ्यावर डोलणाऱ्या पिकांना
विचारून बघावी त्यांची किंमत,
आभाळातून बरसणाऱ्या टपोऱ्या
मोत्यांमधून जाणवेल ती गंमत..
मायेचा ओलावा टिकवून त्यांनी
ऱ्हदयाच्या कप्प्यात ठेवलाय,
कलियुगाच्या विळख्यातसुद्धा
मनी मायाळूपणा जपलाय...
कोरोनाने दाखवली त्यांचीच
खरी गरज किती आहे ,
गावच्या माणसांतच खराखुरा
ईश्वर नांदत आहे...
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
