आपली माणसं
आपली माणसं
आयुष्याच्या रंगमंचावर
भेदभावाचा खेळ चालतो
आपली माणसं म्हणतांना
अविश्वासाचे रंग उधळतो...१
कोण आपला ,कोण परका
कोणालाच काहीच कळत नसते
केसांने गळा कापणारी माणसे
जागोजागी भेटत असते....२
मानपान हवा असतो प्रत्येकाला
या स्वार्थी व बरबटलेल्या दुनियेत
आपलं आपलं म्हणून मिरवतांना
जन्मदाते असतात प्रतिक्षेत ...३
कामाच्या वेळी दिसतो समोर
परका असला तरी आपला भासतो
हात जोडून तो काम साधतो
देवाच्या रुपात माणूस म्हणून अवतरतो...४
विश्वासाचे जोखड मानेवर ठेवतो
कामाकडे नजर वेगळेपणाचा ठाव घेते
भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी
स्वतःतला आत्मविश्वास पणाला लावते.....५