आपली माणसं
आपली माणसं
आज तुम्हांला वेगळी किंमत, बाकी विशेष दृष्टी.
आंधळ्यानां ही माहीत असते, एक ती काळी श्रुष्टी.
उत्सव हा रंगाचा, थोडा थाटात करायचा.
निसर्गाचीही काळजी घ्या, त्याला का मारायचा.
समजून सगळे नियम, बाळगून सगळी काळजी.
आपल्यान सोबत आपलीच, जबाबदारी माझी.
बाकी सगळं उत्तुंग, साजरे करा भव्य.
त्रास कोणालाही नको, मग दिसेल ते दिव्य.
रूढी परंपरा त्या, नका लाऊ गालबोट.
निस्तरताना नंतर सगळं, खिशात उरणार नाही नोट.
बाकी काही सांगणे नाही, काळजी असावी स्वतःची.
आपली माणसं ती खास आहेत, तुमच्या मताची.
