STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

आपले कांदेपोहे हेच बरे

आपले कांदेपोहे हेच बरे

1 min
242

गेल्या व्हॅलंटाईन ला 

दिला जिला गुलाब

 तिच्या भावाने इतका  हाणला

की लागले मला जुलाब

 मग केली तीला बाद

 सोडला तिच्या प्रेमाचा नाद


 मग एका व्हॅलेंटाईन ला

 एकीला दिला टेडी 

पण ती इतकी मुडी की

 प्रेमाची वाट सारी टेडी मेढी

 मग केली तीला पण बाद

 सोडला तिच्या प्रेमाचा नाद


 मग एका व्हॅलेंटाईन ला

 एकीला दिले चॉकलेट

 ती होती बरी पण

 सगळीकडे कायमच लेट

 मग तिलाही केले बाद

 सोडला तिच्या प्रेमाचा नाद 


 झप्पी कोणीच देत नाय

 किस ची तर सोडा बात 

 जवळ गेले की बसते

 ढुंगणावरती लाथ 


मग म्हटल आता करावी

 ह्याच्यावर देखील मात

 आपले कांदेपोहे हेच बरे 

तेच देतील आता साथ



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy