STORYMIRROR

Devakee Dhokane

Tragedy Inspirational

3  

Devakee Dhokane

Tragedy Inspirational

आणखी एक निर्भया!

आणखी एक निर्भया!

1 min
348

रोज नव्या एका निर्भयाचा अंत होतो,

प्रत्येकजण मात्र संत असण्याचा आव आणतो 

मुलगी शिकवा मुलगी वाचवा असे 

नारे आपणच देतो,

आणि पुन्हा त्याच मुलीचा जीव घेतो 


स्त्री वर्गाचा सन्मान करा असं फक्त कागदावर 

अन भाषणात सांगितलं जातं,

प्रत्यक्षात मात्र स्त्री असण्यावरून

सतत तिला हिणवलं जातं


मूग गिळून गप्प बसण्याचे दिवस गेले आता,

नारी शक्ती आता तूच शोध तुझ्या कर्तृत्वाच्या वाटा 

ठेचून काढायला हवे समाजातील सगळे साप हे  विषारी,

स्वत:च्या आस्तित्वाच्या लढ्यातून पुन्हा नको फिरायला माघारी


वासनाधीनतेने बरबटलेल्या नराधमापासून किती दिवस स्वत:ला वाचवायचं?

मुलगी, स्त्री म्हणून सतत हेच दु:ख पचवायचं?

स्त्रीलाही हक्क आहे जीवन जगण्याचा,

नवे नवे स्वप्न बघण्याचा,


हक्क तिचा हिरावून घेऊन 

समाजातून तिला बेदखल करू नका,

ज्ञानाचा प्रकाश जरा स्वत:च्याही डोक्यात टाका 

स्त्रीलाही एक स्त्री म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून बघूया,

कारण पुन्हा नको आणखी एक निर्भया !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy