STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

आणिक दुसरें मज

आणिक दुसरें मज

1 min
17.5K


आणिक दुसरे मज नाही आता ।

नेमिले या चित्तापासुनिया ॥१॥


पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।

जागृती स्वप्‍नी पांडुरंग ॥२॥


पडिले वळण इंद्रिया सकळा ।

भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥


तुका ह्मणे नेत्री केली ओळखण ।

साजिरे ते ध्यान विटेवरी ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics