आनंद लुटत आहे
आनंद लुटत आहे
आठवणीत तुझ्या
मी रमत आहे
मात्र तू माझ्या आठवणीत
सुमने उधळीत असावी का?
मला तू भेट दिली
ती अजुनही माझ्या स्मरणात आहे
पण मी दिलेली भेट
बहुदा तू विसरलीपण असावी
कसंं सांगू सखी तुला
तुझ्या विरहात मी बेधुंद झालो
तू मात्र तुझ्या संसारात
आनंद लुटत आहे
