STORYMIRROR

Sujit Falke

Abstract

4  

Sujit Falke

Abstract

आम्ही शेतकरी आणि कृषी कायदा

आम्ही शेतकरी आणि कृषी कायदा

1 min
311

मी म्हणत नाही द्यावी तुम्ही भीक

कि द्यावी कर्जमाफीच दान पदरात

ऱक्ताळलेल्या दोरी अन गर्दनीलाही

नकोय पोकळ माणुसकीचा मुलामा

नकोच आहे ते अवडंबर राजकारणी

आणि तितकीच बिकाउ समाजमध्यमे


नकोच आहे घोषणा आश्वासनांचा पाऊस

की तुमच्या तथाकथित कायद्याचे भिजत घोंगड

चालवा बंदुका निधड्या छातीवर

अन चालवा ते रनगाडे लोकशाहीच्या उरावर

करा वाटोळे एकदा सगळ्याच कृषक जातीचे


पडूद्या सडा रक्तामासाचा ... महामार्गावर

हक्कांसाठी लढाई जर गुन्हाच असेल तुमचा तर

करा होळी त्या समानता सांगणाऱ्या सरनाम्याची

सजवा मैफिली आमच्या रक्तामासाच्या त्या सड्यावर

हसा त्या दु:शासना सारखे अबला लाचार द्रोपदीवर

काढा आमच्या इज्जतीचे दिंधोरे चौकाचौकात नाका नाक्यावर

बेमालुम कापत सुटा आमचे गळे त्या बकवासी कायद्याच्या सुरावर


जाणीवाच्या उणीवा असतील काही माझ्यात

काही तुमच्यात

विखाऱ्याच आयुष्य मीही जगलो आहे उन्हातन्हात

ओला सुखा अनुभवला आहे पूर्ण वयात

मी म्हणतो शेवटचाही हिसकावून घ्या घास ताटातुन

अन द्या भिरकावून श्रीमंतांच्या पायरीवर

अन पहा वाट आमच्या निशब्द मरणाची

काही आज

काही उद्या

अन उरलेल्या भविष्यातही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract