आम्ही ऋणी साहित्याचे
आम्ही ऋणी साहित्याचे
आम्ही ऋणी साहित्याचे
आम्ही ऋणी लेखणीचे
सामर्थ्य दिले आम्हांला
साहित्य दिले आम्हांला
विचारांची उकल मांडताना
भावना दिल्यात आम्हांला
सर्जनशील विचारांना
चालना मिळाली आम्हाला
वैचारिक दृष्टिकोन
प्रतीसाद मिळतो आम्हाला
कल्पनात्मक विचारांतून
चालना मिळे कलागुणांना
भिन्न विभिन्न भावभावनाना
वाव मिळतो आम्हांला
अव्यक्त भावना व्यक्त होऊन
कागदावर अवतरतात
प्रतिभेचे पंख लावून
विहार करतो नभात
शब्दांची गुंफण घालून
काव्य आविष्कार करतात
ऋणी आम्ही साहित्याचे
मनापासून व्यक्त करतात
