आमच्या जीवाची माती
आमच्या जीवाची माती
उधाणाचे पाणी घरादारात घुसले
आणि धरणांचे मात्र तोंड फिरवून रूसले
थंडीने दिले सुख आता कडक उन्हाचा चटका
आणि तिकडे आता म्हणतात गारांचा फटका
सोसाट्याचा वारा आहे तरी घामाच्या धारा,
चैन नाही जीवाला वाढतोय सूर्याचा पारा
झाडांची कत्तल केली घेतला त्यांचा प्राण
रानाला नाही जीव, निसर्गाची गेली शान
वसुंधरेवरची ओरबाडली एक न एक पाती
तुमचा विकासाचा झेंडा आणि आमच्या जीवाची माती
