आमच्या गावाकडे ...
आमच्या गावाकडे ...
आमच्या गावाकडे
घराची दारे
असतात सताड उघडी
कपडे असतात अंगभर
नसतात उघडे नागडे
आमच्या गावाकडे ...........
मारुती च्या पारावर संध्याकाळी
हरिपाठ चाले धरुन कडे
पिझ्झा बर्गर मिळणार नाही
रानमेवा सर्वांना आवडे
आमच्या गावाकडे ...........
चुलीवरची भाकर अन्
मिरचीचा ठेचा
बाजेवर वाळलेले खमंग वडे
काय सांगू कसे सांगू
शब्द पडतात तोकडे
चला ताई चला दादा
आमच्या गावाकडे .....,......
