आमचा भारत आमचा अभिमान
आमचा भारत आमचा अभिमान
आमचा भारत आमचा अभिमान
आम्ही सर्व या देशाची शान
आम्ही पाईक या देशाचे
या सृष्टीच्या सौंदर्याचे
हिच्या टिळा आमच्या भाळी
हिची उपज भरे आमची थाळी
हिला रक्षिण्या आमचे प्राण
हिचे हस्तक आमचे मस्तक
चहूदिशांना कीर्ती आमची
या भारत भू ची महती किती
संत महात्मे थोर पुरुष
वैज्ञानिकही इथे घडे
इथला स्त्रीची किती बुद्धी
जय युद्ध ही मागे पडे
लहान मोठा गरीब बापडा
एकजुटीने काम करू
मातीतून उगवती मोती
नितितूनच आमची प्रगती
आमचा भारत आमचा अभिमान
आम्ही सर्व या देशाची शान
