हिरकणी
हिरकणी
1 min
201
अग हिरकणीचं तू
कितीची झीजशिल तू
किती सोसशील तू ,
सलाम माझा तुझ्या मातृत्वाला
पुरुषही नतमस्तक होई तुझ्या ममतवाला
वंदनीय तुझी जिद्द धडपडण्याची,
पोटच्या गोळ्याला उंच भरारी घेताना पाहण्याची
शूर शिवबा जन्म तुझ्या कुशीत घेई
स्वराज्याचे स्वप्न तुझ्यामुळे पूर्णत्वास नेई
धन्य तू स्त्रीशक्ती, धन्य तुझी भक्ती
तुझ्याविना शून्य वाटे चराचराची सृष्टी
