STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

2  

Latika Choudhary

Inspirational

आलास दुःखा

आलास दुःखा

1 min
14.8K


आलास दुःखा दारात माझ्या

मज्जाव तुजला शब्दात माझ्या

माहित नाही मज हारणे ते

गाथा यशाची रक्तात माझ्या

सुखी ना कोणी बघ आज येथे

(नाही सुखी कोणी आज येथे)

का ठाण मांडी गावात माझ्या

सांभाळ दुःखा आता तुला तू

बळ सोसण्याचे हातात माझ्या

बर्बाद झाले तुज श्वास देता

आबाद मी रे मरणात माझ्या

वृत्त-          

लगावली - गागालगागा गागालगागा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational