आला ऋतू पावसाचा
आला ऋतू पावसाचा
अवनीने नेसला हा
शालू सुंदर सृष्टीचा....
पाहता दृश्य वाटले
आला ऋतू पावसाचा ।।
गार शीतल पवन
स्पर्शही बोचरा त्याचा...
गंधात मृदेच्या भासे
आला ऋतू पावसाचा ।।
फुलपाखरे उडती
सुगंध घेत फुलांचा....
विलोभनीय देखावा
स्वच्छंदी हा फिरण्याचा ।।
लगबग शेतामध्ये
दिस येता पेरणीचा.....
पावषा ही धून गाई
आला ऋतू पावसाचा ।।
पावसाच्या या सरीत
आनंद चिंब होण्याचा....
भिजलेल्या देहास या
पाहताच लाजण्याचा ।।
मोहरून सख्यासवे
आनंद घेता सरींचा.....
आपसूक येई मनी
आला ऋतू पावसाचा ।।
