STORYMIRROR

Supriya Devkar

Classics

3  

Supriya Devkar

Classics

आला आषाढ श्रावण

आला आषाढ श्रावण

1 min
178

दारी पावसाचा खेळ आला आषाढ श्रावण

कधी उन्हाची लकीर कधी सरींचं धावणं||१||


शालू हिरवा ल्यालेला जणू नवरी नटली

राबे माझा शेतकरी त्याने पेरणी थाटली||२||


आल्या सरी श्रावणाच्या झिम्मा फुगड्या खेळाया

सनावारांचे औचित्य लेकी लागल्या सजाया||३||


दर्या डोंगर फुलले दाटे हिरवळ न्यारी

पहा निसर्गाचे दान खुले नवलाई सारी||४||


चला बनवूया होड्या उड्या मारूया पाण्यात

वारा घालतोय शीळ दंग होऊया गाण्यात||५||


असा श्रावण सोहळा करा आनंदी साजरा

दुःख विसरून सारे माळा केसात गजरा||६||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics