STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Drama Tragedy

2  

Rutuja kulkarni

Abstract Drama Tragedy

आजकालं नात्यांना ही

आजकालं नात्यांना ही

1 min
87

आजकालं नात्यांना ही,

व्हाॅटसअप चं रूप आलयं

डिपी सारखा ते ही दुरूनचं,

सुंदर भासू लागलयं,

आजकालं नात्यांना ही


आजकालं नात्यांना ही,

व्हाॅसअप चं रूप आलयं

दुःखात सहभागी होण्याऐवजी ते,

स्टेटस ला ठेवणं महत्त्वाचं वाटू लागलयं,

आजकालं नात्यांना ही


आजकालं नात्यांना ही,

व्हाॅसअप चं रूप आलयं

आनंद ही ईथे आता फक्त,

इमोजी वरूनचं कळायला लागलयं,

आजकालं नात्यांना ही


आजकालं नात्यांना ही,

व्हाॅसअप चं रूप आलयं

लग्नात साठी चे आशीर्वाद ही ईथे, 

व्हिडिओ कॉल करून मिळायला लागलयं,

आजकालं नात्यांना ही


आजकालं नात्यांना ही,

व्हाॅसअप चं रूप आलयं

क्षणार्धात नातं ही सहजतेने ईथे,

डिलीट होऊ लागलयं,

आजकालं नात्यांना ही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract