आजी आणि नात
आजी आणि नात
आजीसाठी असते नात खरी
जपलेली दुधावरची दाट साय |
तर नातीसाठी असते आजी
तिच्या आईपेक्षाही मोठी माय | |१| |
आजी आणि नातीचे म्हणून तर
चांगलेच जुळत असतात सूर |
आजी नातीला होत नाही मुळी
एकमेकांच्या पासून जाताच दूर | |२| |
आजीच्या गोधडीची ऊब तिला
सासरी गेल्यावर राही जाणवत |
तिच्या आठवणींत ती रडल्याचे
विचार मनातही नाही आणवत | |३| |
आजी नात असतात जणू काही
दर्पण एकमेकींच्या मनातला |
अपतात आदर्श नाते संस्कारांचे
धागा रेशमी चोळीच्या खणातला | |४| |
