आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढील प्रश्न
जागतिकीकरण,उदारीकरण,खाजगीकरण
आणि असंच काहीबाही मुळंच
जगण्याची गणित बदलली
माणसांमाणसाली दरी दिवसांगणित वाढत चाललीय
साधनं वाढली पण साधना मात्र कमी होत चाललीय
अहंकार नैराश्यचं ओझं वाहणाऱ्या माणसांची कुतरओढ वाढतच जातेय
आताशी त्याला मोकळं आभाळ दिसतच नाही किंवा
उडणारे पक्षीही दिसत नाहीत
त्यांना दिसतात ते फक्त
खुराड्यात अडकून पडलेली
लुळी पांगळ्या अवस्थेतली पाखरं
जिंवत असूनही जिवंत नसलेली पाखरं
याचीही काही प्रश्न माणसांसारखेच असतील काय ???
या प्रश्नांतच त्यांची उत्तरं असतील काय ??
उत्तरामागून प्रश्न न्
प्रश्नांतच त्याची उत्तर
काही उत्तर अर्धवट तर काही पूर्ण
हाच तर नसेल ना आजच्या काळापुढील प्रश्न ???
