आजची स्त्री
आजची स्त्री
त्रैलोक्याला पडते भारी
अशी दिव्य मी नारी
आस्तित्वाला नका ललकारू
मी आहे जग जिंकणारी।। १।।
सावित्रीची लेक असे मी
जिजाऊंची वारस ही
वात्सल्याची मुर्ती अन्
हिरकणीचे धाडस ही।।२।।
यम होई नत जिच्यापुढे
अशी पतिव्रता सावित्री मी
गरूडाची जिद्द घेऊनी
आकाश केले काबीज मी।।३।।
अन्यायाचा प्रतिकार नव्हे तर
करीन त्याची राख मी
घेतला मी ध्यास आता
आणि डोळ्यात आग ही।।४।।
उत्सव एक दिनाचा नाही
वर्षभराची राणी मी
बदलणार आता सारी
माझी जीवन कहाणी ही।।५।।