STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

आजची स्त्री

आजची स्त्री

1 min
482

स्त्रीच्या शिवाय ना काही 

तुझे रूप आहे किती 

घेतेस झेप आकाशी 

किती मी सांगु महती 


गुलामीच्या विळख्यात 

होतीस अडकलेली 

तोडुनी बंद जगाचे 

सन्मान जोपासलेली 


तूच आहे नारीशक्ती 

घडवे तुझे नशीब 

तुला ना कशाची भीती 

तुझाच सारा हिशोब 


नाते जपुनी चालते 

ना कोणास दुखावते 

मी ही आहे भाग याचा 

हे सर्वांना दाखवते 


कष्टाला ना पडी बळी 

सोसुनी सारे चटके 

कधी ना तू मागे सरे 

अन्यायास दे फटके


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational