आजचा विषय - ऐतिहासिक
आजचा विषय - ऐतिहासिक
सह्य डोंगररांगांनी वेढलेला
महाराष्ट्रातला अभेद्य किल्ला
शिवरायांची स्मृती करुन देणारा
राजांनी राजधानीचा मान दिला
मूळ नाव असे त्याचे रायरी
युरोपांनी ठेवले नाव जिब्राल्टर
आहे अजिंक्य दुर्गम हा गड
शिवरायांचा गड तो फाईटर
साऱ्या किल्ल्यात उंच गड
शत्रूवर नजर ठेवणे सोयीस्कर
किल्ला पाहून राजे झाले खुश
राजधानीचे केले सोपस्कार
शनिवारी ललिता पंचमीतिथिला
शिवरायांनी स्वराज्याभिषेक केला
गडावर सोयी विहिरी सरोवरे कूप
राजारामांचा मुंजीचा कार्यक्रम झाला
पार पाडला पुत्रविवाह सोहळा
प्रताप गुजर व्याही तो बनला
गनिमाने रायगडावर केला हल्ला
गडाने धन्याचा आब तो राखला
शिवरायांसाठी उत्तम व्यवस्था केल्या
पण किल्ल्याने दुःखद प्रसंग साहिला
सर्व सोयींनी किल्ला मजबूत केला
रायगडाने राजांचा मृत्यू ही पाहिला
