आज समजलं मला...
आज समजलं मला...
आज समजलं मला आयुष्यात, खूप काही करायचं राहिलं
तुझ्यासाठी जगता जगता, माझ्यासाठी जगायचंच राहिलं
जग बघत होतं माझ्याकडे, मला समजलंच नाही
तुझ्याकडे बघता बघता, जगाकडे बघायचंच राहिलं
आनंद घेत राहिलो मी, सगळ्या तुझ्या सुखांचा
हासत राहिलो तुझ्यासाठी मी, पण माझ्यासाठी हसायचंच राहिलं
प्रत्येक तुझ्या अदेवर, मी लिहीत राहिलो इतका
सरलं आयुष्य माझं, माझ्या आयुष्यावर लिहायचंच राहिलं
गोड तुझ्या आठवणीत, चिंब भिजत राहिलो
मनमोकळेपणाने पावसात, एकदा भिजायचं राहिलं
जगलो तुझी स्वप्ने सारी, मी अशा धुंदीत
की एकदातरी स्वतःसाठी, स्वप्न बघायचं राहिलं
आयुष्य फक्त तुला, आपलंसं करण्यात घालवलं
वाहून गेले क्षण त्यांना, आपलंसं करायचं राहिलं
आठवणींच्या धुक्यात तुझ्या, हरवून गेलो असा
की हरवलेलं आयुष्य माझं, मला शोधायचंच राहिलं