आज मी ओलांडला उंबरठा
आज मी ओलांडला उंबरठा
मी लढले आज पुन्हा
मलाच न्याय देण्या,
मी पुसूनी माझे अश्रू
आज ओलांडला उंबरठा
मी मुकीच होते तेव्हा
आज कंठ फुटला मला,
मी स्वातंत्र्याचे गाणे गात
आज ओलांडला उंबरठा
मी आठवले लक्ष्मीला
त्या जिजाऊ, सावित्रीला,
मी तोडून सारी बंधनं
आज ओलांडला उंबरठा
