STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

आज लक्ष्मी आली घरा...!

आज लक्ष्मी आली घरा...!

1 min
1.0K

आज लक्ष्मी घरी आली.....!

स्वागत....!


सकाळी सकाळी आलीस आई

स्वागत करतो मी माझ्या घरी

ऐक सनई चौघडे वाजविले बघ

करितो प्रसन्न चित्ते औक्षण दारी....


सौख्य समाधान शांती

पैसा अडका मानमरातब

सारेच वसते ग तुझ्या पदरी

घे सामावून मज तुझ्या उदरी...


पूजा अर्चा अन ध्यान साधना

घडू देत ग तुझ्या सदैव चरणी

तुझ्या कृपेने चन्द्र सूर्य तारे

अन नारळात पाणी तुझी करणी....


विराजमान हो तू इथे आसनी

सदैव प्रसन्न राहुनी कृपा करी

चुकले माकले जरी काही

तरी तू हात धरुनी क्षमा करी...


लेक तुझा द्वाड लाडका

घे समजुनी तू हृदयातुनी

सदैव धावा तुझाच उमटतो

ग आई माझ्या अंतरातूनी....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational