आईच्या मृत्युची खंत
आईच्या मृत्युची खंत
आई माझी प्रेमळ
स्वभावाने शांत
अल्झायमरसारख्या
आजाराची लागली खंत
वर्तमानातील आठवेना
भूतकाळ सर्व आठवे
जीवन तिचे त्यामुळे
अवघड झाले दुखणे
अचानक एके दिवशो
भावाचा निरोप आला
गेले तर समजले
आई सोडून गेली आपल्याला
काहीच कल्पना नव्हती
अचानक आघात झाला
इतकी मी भावनाप्रधान
टिपूस नाही डोळ्याला
संवेदनाच गोठल्या
खरे वाटेना सारे
आओवाचून आता
जग नीरस सारे
