STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

आईची महती

आईची महती

1 min
354

आईची महती


जन्म देणारी माय माऊली

लेकरांची पुण्याई असते

तिला न ठावे भेद जरासा

आई केवळ आई असते।।१।।


पशू, मानव माय सर्वांना

विश्वाची नवलाई असते

बाळासाठी ममता हृदयी

आई केवळ आई असते।।२।।


उदरात ओझे वागविते

त्रास साहुनी जन्मही देते

रक्ताच्या थेंबाचे दूध होते

बाळाला मायेने भरवते।।३।।


आई झोपली निवांत येथे

स्तनास तिच्या पिले लुचती

कुत्र्या सोबत मांजर पिल्लू

तिच्या दुधाची मजा लुटती।।४।।


माता पिलांचे नाते जगती

सर्व नात्याहून श्रेष्ठ असे

ईश्वराचे प्रेमरूप आई

जगी अलौकिक गोष्ट असे।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational