आईची कुशी
आईची कुशी
पाय छोटे खरं चालायची घाई
पळताना पटकन पळून येई आई
हट्ट असायचा दिसेल ते घेण्याचा
जास्तच रडलं तर धपाटा बसायचा
साऱ्या गोष्टीचं वाटायचं फार कुतूहल
औषधाची गोळी लपवून करायची दिशाभूल
गोष्टी, वस्तू काहीच समजत नव्हतं
चालणं बोलणं काहीतरी चालत असतं
किती असायच्या बऱ्याच गमती जमती
आईच्या कुशीतलं बालपण सुरक्षित वाटती
