आईची भाकर
आईची भाकर
आईची भाकर,अमृताचि त्याला चव
प्रेमाचा त्यात वास, भरून जाई मग पोट
आई माझी, अन्नपुर्णा खरी येई खमंग वास
खाऊन दोन घास,मग सगळ्याचे भरे पोट
पाहुणचार चाखण्यास येई नातगोत
चुलीवर माय माझी घेई हो त्रास
धुराशी तिचे चाले, गुणदोष रुपी हो युद्ध
शस्त्रे हाती फुंकणीचे,करे ती गोड घास
मित्र सोयरे,चाखला हो यांनी तो स्वाद
एक एक नवीन पदार्थाची लय हो तिला हौस
शेजार-पाजाऱ्यांना देई नेउन घासातला ती घास
आई तुझ्या जेवणाची चव नाही गं कुणास
आई माझी नाही करत स्वयंपाक
ती जाऊन बसली आज फोटोत
हरवला तो स्वाद, ना चाखले मी पुन्हा बोट
आई माझी शांत, हसरी दिसते आज फोटोत
