आई
आई
आईचे महत्त्व | काय मी सांगावे
कसे आकळावे |मूढ जना १
आईच पहिले | दैवत महान
देई शिक्षा छान |लेकराला २
चालाया शिकवी |घासही भरवी
तिची मी थोरवी |कशी वर्णु ३
मातृ देवो भव | मंत्र हा महान
चिंतन, मनन |करु नित्य ४
वेद झाले मुके | देवाही न कळे
सामर्थ्य आगळे |तिचे असे ५
न पडावा विसर | तिचा क्षणभरी
नमन तिला करी |दास म्हणे ६
