आई
आई
आयुष्य जिथून सुरू होते ती म्हणजे आई
जी न सांगताच सगळे समजते अशी ही आई
आपल्याला आपल्यापेक्षाही चांगले ओळखणारी आई
आपण मात्र जिला कायम ग्रुहित धरतो तीच हि आई
तिचा त्याग हा आपल्याला कधीच दिसत नाही
विशेष म्हणजे ती कधीच त्याचा उल्लेख देखील करत नाही
ती फक्त देतच राहते काही अपेक्षा न ठेवून
तिचा प्रत्येक निर्णय ठरतो प्रथम आपला विचार करून
फक्त काही शब्दांमध्ये कशी वर्णावी तिची पुण्याई
अमर्याद प्रेम देणारी एकच व्यक्ती ती म्हणजे आई
