STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

आई

आई

1 min
8



            

वात्सल्य प्रेम आस्था, आई सदा पुरवते
सरिता अखंड वाहे, आई अशीच असते 

कोणी करो न काही, मानो तिला न मानो
निरपेक्ष भावनेने, आई सदैव जपते 

देण्या सुगंध चंदन, झिजवीत जाय काया
बाळास सौख्य द्याया, आई तशीच झटते 

देतो निसर्ग जैसा, देणे अमाप त्याचे
तैसेच माय देते, कोठेच कसर नसते
 
आई असेल तोवर, निश्चिंत छत्र छाया
आईविना परी हे मन पोरकेच बनते

जगण्यातल्या अपेक्षा, असतील ना तिच्याही
मी का कधी न पुसल्या, ही खंत आज छळते

ऋण फक्त जन्मदेचे, फिटणार ना कधीही
साक्षात त्यागमूर्ती, दिनरात्र माय खपते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract