STORYMIRROR

Namdev Yedage

Inspirational

4  

Namdev Yedage

Inspirational

आई तुझ्यासाठी

आई तुझ्यासाठी

1 min
385

इवलासा हात पकडून आणलंस मुंबईला 

आत्मविश्वासाने सामोरे गेलीस तुझ्या मनातल्या भीतीला

या नव्या शहरामध्ये तुला काहीच सुचेना

माझ्या लेकरांसाठी काय करावे काहीच मार्ग दिसेना


शिक्षणाचा मार्ग तुला दिसला असावा

जो आपल्या समाजात कोण्या स्त्रीने पाहिला नसावा

लोकांची धुणीभांडी करुन, करत होतीस अपार कष्ट

आपली लेकरं शिकून होतील मोठी, या स्वप्नाने तू होत होती संतुष्ट


आपलं लेकरु दुसऱ्याकडं मागतंय, हे पाहून तुझ्या हृदयाला ठेच लागत होती

त्याच्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट तू पुरवत होती

प्रत्येक सणाला लागणारं सगळं काही दिलंस

हातात पैसे नसतानाही काही कमी नाही पडणार, इतकं तू केलस


बाप नसतानाही तू आमचा बाप झालीस

बापाच्या मायेची कमी कधीच नाही पडू दिलीस

तुझी नेहमीच राहिली आम्हाला साथ

म्हणूनच जीवनातल्या प्रत्येक वादळावर केली आम्ही मात


तुझ्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो

इथपर्यंत येताना ठिकठिकाणी खचलो 

तेव्हा समोर माझ्या, तुझ्या जीवनाचा इतिहास होता

तू केलेल्या अपार कष्टाचा माझ्या डोक्यावर हात होता


आज तुला काहीतरी सांगावं वाटतंय 

या साऱ्या आठवणींनी माझं मन रडतंय

तू नसतीस तर काय झालं असतं

कदाचित इतकं सुंदर आयुष्य कधी मिळालंच नसतं


म्हणूनच

माझ्यासाठी इतकं करणाऱ्या माझ्या आईला मानाचा सलाम...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational