STORYMIRROR

Namdev Yedage

Romance

3  

Namdev Yedage

Romance

नकळत

नकळत

1 min
96

सुरवातीला त्याची ओळख हाय बाय पुरती होती, 

ओळख आता मैत्रीत बदलली होती,

मैत्रीच्या नात्याने ते एकमेकांना वेळ दयायचे,

त्या वेळेत ते एकमेकांचे अनेक तास घ्यायचे


भेटून गप्पा मारण, फोनवर तासनतास बोलणे,

असे त्यांचे फार चालू होत,

एकमेकांशी न बोलने झाल्यास,

हक्काने रागावणे हितपर्यंत त्यांच नात आल होत


त्याच्याबरोबर काही घडल तर तो पहिल तीलाच सांगायचा, 

मित्रांनी जरी सांगितले तरी तो तिचच मानायचा,

तीचही काही फार वेगळ नवत, 

दोघांच वागण हे सारखच झाल होत


दोघांचही आयुष्य आता फार बदलल होत,

बोलन, भेटण, रागवण याच्याही पलीकडे त्याचं नात गेल होत,

दोघेही एकमेकांशिवाय राहु शकत नवते

कारण 

दोघेही एकमेकांच्या नकळत प्रेमात पडले होते


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance