STORYMIRROR

Namdev Yedage

Others

4  

Namdev Yedage

Others

तू तुझीच होऊन जग

तू तुझीच होऊन जग

1 min
454

आलीस ये, ये आतमध्ये 

बस निवांत, थोड पाणी पी

दमली असशील तर थोडा आराम कर, 

नसेल आराम करायचा तर निवांत बस, 

जमल्यास थोड चिंतन कर, स्वत:बदल

खुप प्रेम आहे ना तुझं माझ्यावर 

मला आवडेल तसं सगळं करायचं 

मला राग येणार नाही तसं वागायचं 

सगळं काही माझ्या आवडीनुसारच

अगदी तु करत असलेल्या विचारांमधये, 

ही माझ मन दुखावल जाणार नाही इतकी काळजी घेतेस,

इतक प्रेम करतेस माझ्यावर

खुप छान, सुंदर वाटत, माझ्यासाठी तु इतक करतेस, पण 

एक खंत आहे आणि तेवढच दुःखही

कदाचित मी तुला वरचड ठरत आहे as usual ह्या पितृसताक समाजासारखा

तुही बदलत चालली आहेस

तुही तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहेस, 

तु विसरत चालली आहेस स्वत: ला

तु नाहीस पहिल्यासारखी, स्वच्छंद ऊडणाऱ्या पाखरासारखी

भीती ह्याची की, तु स्वत:च अस्तित्व संपवत चालली आहेस

किंबहुना संपवलस

माझ तुझ्यावर नितांत प्रेम आहे

तुला मी ह्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या महाजाळयात अडकून देणार नाही,

तु एक स्वतंत्र व्यक्तीमत्त्व आहेस

हे विसरण चालणार नाही, तुलाही अन् मलाही

शेवटी एकच सांगीण

तु तुझीच होऊन जग

तु तुझीच होऊन जग



Rate this content
Log in