STORYMIRROR

Namdev Yedage

Others

3  

Namdev Yedage

Others

12x16 ची खोली

12x16 ची खोली

1 min
97

12×16 ची खोली 

खोलीत नव विवाहित दाम्पत्य

सोबत एक डवर माणुस

अन प्रेमाची आस


रात्रीची वेळ 

प्रेमाची चाहूल

अंगाची वळवळ

काकणांचा आवाज

अन डवर्याला आलेली जाग


पहिल डाविकडे 

मग उजविकडे

नंतर समोर

नजर फिरवुन

आतुरतेने घेतलेले चुंबन


12×16 ची खोली

सुट्टीचा दिवस

डवऱ्या बाहेर, दाम्पत्य आत

बंद दरवाजा

बंद खिड़की

आसुसलेले ओठ

अंगाची तळमळट

घट्ट मारलेली मिठी


देहाचा स्पर्श

गजऱ्याचा सुगंध

एकमेकांत गुंतलेल मन

समरूप होण्याच्या मार्गावर

अन दरवाज्याचा ठक ठक आवाज


12×16 ची खोली

डवऱ्याची नजर चुकवुन

पकडलेला हात

प्रेमाची जमवाजमव करण्यासाठी

नजरेचे केलेले इशारे

अन प्रेमात विलीन होण्यासाठी

चाललेली दोघांची धडपड


डवऱ्याची नजर

मनाची घालमेल

आँखों से दिल के इशारे

अन प्रेमाचा लपंडाव

12×16 ची खोली



Rate this content
Log in