STORYMIRROR

Namdev Yedage

Others

4  

Namdev Yedage

Others

प्रेमाची पालवी

प्रेमाची पालवी

1 min
391

सकाळी सकाळीच पावसाने दारे उघडी केली,

अन् पावसात भिजण्याची संधी आवर्जून आली,

मनात नवीन स्वप्ने रंगू लागली

अन् स्वप्नात, तिला आज त्याच्यासोबत मनसोक्त हसताना पाहिले

निघून जातात दोघे आपल्या प्रेमाच्या दुनियेत,

तिथे ती, तो आणि फक्त चिंब भरलेला पाऊस,

त्यांची नजर आकाशाकडे वळते,

आस लागते दोघांना पावसाची,

आतुरतेने वाट बघतात थेंब अंगावर झेलण्याची,

आज ठरवतात ते चिंब भिजायचं, 

पावसाच्या सरींमध्ये एकरूप व्हायचं,

दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात,

तितक्यात ढगांमध्ये विजा कडाडू लागतात,

विजांचा आवाज ऐकून ती त्याच्या मिठीत येते,

अन् पावसाची सुरवात होउन,

त्यांच्या स्वप्नाना नवीन पालवी फुटते, नवीन पालवी फुटते


Rate this content
Log in