STORYMIRROR

Namdev Yedage

Others

3  

Namdev Yedage

Others

साथी

साथी

1 min
255

बघ जरा मागे वळून 

आजही मी तिथेच उभा आहे

तुझ्या शोधात, तुझ्या प्रतिक्षेत 

मन ही माझ सांगतय तू येशिल, म्हणून 

लोकशाही अन व्यक्ति स्वातंत्र्याच्या मार्गाने तुला मिळवायचय 

कारण, स्वार्थी नाही तुझ्या आयुष्याचा साथी व्हायचय..


या समाजकंटकांनी बनवलेल्या समाजात

तुझ्यासमोर असंख्य संकटे उभी राहतील

तुझ्या सुंदरतेचा, तुझ्या मानुसकिचा विनाशही करू पहातील

पण तुही तितकिच सक्षम असशील

हाताला दोन हातही करशील

तरीही तुझ्यावर केलेला वार मला झेलायचाय

कारण, स्वार्थी नाही तुझ्या आयुष्याचा साथी व्हायचय..


माणुसकीच्या वाटेवरन एक माणूस म्हणून जात असशील

जात, धर्म, वर्ग याचा त्यागही तू करशील, पण

माणुसकीच्या वाटसरुंसाठी हा समाज, ही वाट नसेन

तरीही समाजाला धुड़कवून तुझ्यासाठी तुझ्यासोबत मी असेन

या वाटेवरुन जाताना अनेक काट्याची झुडूप लागतील

त्या झुडपाना छाटून, तुझ्यासाठी मार्ग मोकळा करायचाय

कारण, स्वार्थी नाही, तुझ्या आयुष्याचा साथी व्हायचय....


Rate this content
Log in