STORYMIRROR

Namdev Yedage

Others

4  

Namdev Yedage

Others

गुंतता गुंतता

गुंतता गुंतता

1 min
381

गुंतता गुंतता असा गुंतलो तुझ्यात |

की बाहेर पडावसच वाटे ना ||


बघता बघता स्वप्न तुझी |

की झोपेतून उठावेच वाटे ना ||


चालता चालता सोबत तुझ्या असा|

की हात हातातून सोडवाच वाटे ना||


डोळ्यांनीच डोळयांना केलेल्या नजर कैदेतून |

असा मुक्त व्हावसच वाटे ना ||


प्रेम प्रेमात बहरला गुलमोहर असा |

की तुझ्याविना फुलावसच वाटे ना ||


गुंतता गुंतता असा गुंतलो तुझ्यात |

की बाहेर पडावेसेच वाटे ना ||


Rate this content
Log in