Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Namdev Yedage

Romance

3  

Namdev Yedage

Romance

ती, समुद्र आणि मी

ती, समुद्र आणि मी

1 min
1.6K


आज सहजच आलोय इथं

तुझ्या मित्राला भेटायला,

हो तोच मित्र

जो तुझ्या अगदी जवळचा आहे

ज्याची सोबत तुला नेहमीच हवीशी वाटते

ज्याच्यात तू तासन् तास रमतेस

त्याच्याशी खूप गप्पा मारतेस

आणि मोकळीसुद्धा होतेस मनातून,


ज्याचा सहवास तुला सुखावतो

हो तोच, त्याच्यासोबत तू खेळतेस बागडतेस

मी त्याच्याबद्दलच बोलतोय

ज्याच्याबरोबर तुला अगदी एकटेपणात वेळ घालवायला आवडतो

मग तू आणि फक्त तो


हो तोच तो तुझा समुद्र, दर्या, सागर अथांग सारा

आलोय थोड्या गप्पा मारायला मीही

तुझं त्याचं असलेलं सुंदर नातं समजून घ्यायला,

बघ ना किती सुंदर आठवणी सांगतोय तो

अगदी आपल्या सहवासातले क्षण देखील सांगतोय,


मीही रमू लागलोय त्याच्यात,

बघ ना इथल्या लाटा, वाळू, शंख शिंपले अगदी तसेच्या तसेच आहेत,

अगदी आपल्या आठवणीसुद्धा,

तुला आवडेल की माहित नाही, पण मी घेऊन चाललोय सोबत माझ्या थोडसं

इथली वाळू, शंख, शिंपले आणि हो तुझ्या समुद्राचा नजारासुद्धा डोळ्यांत भरून,

जे आपल्या आठवणींना सदैव माझ्या डोळ्यांसमोर ठेवतील,

मी असेपर्यंत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance