STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Others

आई - मनाचा किनारा

आई - मनाचा किनारा

1 min
233

आईसाठी पुरतील एवढे

शब्द नाहीत कोठे |

आई साठी काय लिहू?

आई वरती लिहीण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे ||१||


जीवन हे शेत आहे तर

आई म्हणजे विहीर |

आई म्हणजे काय नव्हे?

जीवन ही नौका तर 

आई म्हणजे तीर ||२||


आई म्हणजे भजनात 

गुणगुणावी अशी संतवाणी |

आई बद्दल आणखी काय सांगू?

आई म्हणजे वाळवंटात 

प्यावं असं ठंडगार पाणी ||३||


आई तू उन्हामधली सावली

आई तू पावसातली छत्री

आई तू माझ्यासाठी काय नाही?

आई तू थंडीतली शाल |

आई तुझ्या आशीर्वादाने

माझ्या *मनाचा किनारा* खुशाल ||४||

________________________________


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational