Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Tragedy

5.0  

Neha Ranalkar

Tragedy

आई माझी होती

आई माझी होती

1 min
365


आई माझी होती ईश्वरी अवतार!

जन्म तिच्या कुशीत तीच आधार!!१


तिच्याविणा कसा जीवना आकार!

वात्सल्यासाठी तिच्या झाले लाचार!!२


कशी करु स्वप्ने तिचीआज साकार!

गेली सोडून आमचे घर नि संसार!!३


मनी वसे काळोख,जिवनी अंधार!

गळा दाटला मम दु:खाचा हुंकार!!४


नेत्रांतून ओघळला अश्रूंचा अंगार!

फुटेना शब्द निघेना "आई "उच्चार!!५


होती आई माझी ममतेचा सागर!

कुणा देवीदेवतांचा करू मी जागर!६


कोण मज घालिल मायेची पाखर?!

मजसाठी रिती तिच्या प्रेमाची घागर!!७


आटला तिच्या निर्व्याज प्रेमाचा सागर!

आज तिजविण वाटे मी खरी पामर?!!८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy