STORYMIRROR

Tanuja Mulay

Abstract

3  

Tanuja Mulay

Abstract

आई बदलतेय

आई बदलतेय

1 min
164

आई आता दिसत नाही सतत

कळकट मळकट धुडक्यात

दिवसभर कामाच्या रगाड्यात

आई आता मस्त जीन्स टॉप घालतेय

आई आता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढतेय

कारण आई आता बदलतेय


आई आता बसत नाही चुलीपुढे

लाकडं फुंकून फुंकून डोळे लाल करत

आई आता स्मार्ट किचन मध्ये

नवं नव्या रेसिपी बनवते

कंटाळा आला तर चक्क स्विगीचे

पार्सल मागवतेय

खरंच आई आता बदलतेय


आई आता पसरत नाही बाबांकडे हात छोट्या छोट्या गरजांसाठी

आणि खात नाही सासूचा आणि नवऱ्याचा मार

उलट आई आता बाबांच्या खांद्याला खांदा लावून कमावतेय

हो खरंच आई आता बदलतेय


आई आता रडत नाही जुन्या दिवसांचे गाऱ्हाणे

सासवा नणंदा जावांचे ते घेत नाही उखाणे

ती आता म्हणत नाही बाईचा जन्म खोटा

उलट मुलाला पराठे अणि मुलीला कराटे शिकवतेय

हो खरचच आई आता बदलतेय


आई आता हसतेय , नाचतेय ,

मनासारखे जगतेय , काळाप्रमाणे बदलतेय , आवडेल तसंच वागतेय 


पण.....

बाळाचं रडणं ऐकू येताच

तीचे पाऊल मात्र थबकतेय

खरंच का आई अगदी पूर्णपणे बदलतेय ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract