STORYMIRROR

Vitthal Jadhav

Tragedy Action Others

3  

Vitthal Jadhav

Tragedy Action Others

आग लागते घराला

आग लागते घराला

1 min
199

आग लागते घराला

तेव्हा

जळतो संसार सारा

नात्यांचा पसारा

नि स्वप्नांचा नजारा

ढासळते

आयुष्यभराची मेहनत

आठवणींचे बुरूज

उमेदीची छलांग

नि काळीजनाती

होते स्वप्नांची राख

काजळती मन भांडे

आक्रोशते आभाळ

नि पंचनामा समक्ष

हळहळी कोरडे शब्द

दवापाणी आश्वासन

खूप काही, खूप काही

आग होरपळ जीवाला

आग ही आग असते

घराला, बुद्धीला वा

पोटालाही लागते!

म्हणूनच

सावध असायला हवे

गुलकाडी आगीपासून

सिलगावणाऱ्यांपासून

ते हवा देणाऱ्यांपर्यंत

सदोदीत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy