STORYMIRROR

Vitthal Jadhav

Tragedy

3  

Vitthal Jadhav

Tragedy

कुणबी ....

कुणबी ....

1 min
775

पडे कापसा फकडी

तसे ज्वारीस चिकटा

ऊसास लोकरी मावा

देती मता लालनोटा


लागते खताला आग 

निघते बियाणे खोटे

पीकांवरी व्हायरस

वायदा नव्याने लुटे


होते वीज गुल कुठे

कोरडा विहीर तळ

आश्वासनांचा पाऊस

भिजेना माती ढेकूळ


असा जेरीस कुणबी

साहेब फिरे थाटात

तुम्ही नेते मोठमोठे

वाढ तुमच्या ताटात


झाला सुनसान गोठा

आले यंत्र हे उशाशी

पिकवणारा उपाशी

तिथे आयता तुपाशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy