STORYMIRROR

Vitthal Jadhav

Tragedy Inspirational Others

3  

Vitthal Jadhav

Tragedy Inspirational Others

कफनकर्ज

कफनकर्ज

1 min
118

अरे शिक्षण शिक्षण

नको निर्दयी बनूस

ज्ञान कुशीतून तुझ्या

निपजू दे रे माणूस


  झाला महाग महाग

  शिकवणीचा भारा

  माह्या दारी गरिबीचा

  दाटे अंधार हा सारा


शिकू कशी मी शाळा

रित्या पोटाचा प्रश्न

कोण चालवी काॅन्व्हेट

कुठे चालतोय जश्न


  मुलं हसरे दिसेना

  खिसा बापाचा फाटका

  असा बाजार मांडला

  हमी कायदा लटका


डोयीचे कफनकर्ज

पिढीगणती ना फिटे

निती, न्याय भरवसा

बसला लपून कुठे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy