STORYMIRROR

Vitthal Jadhav

Others

4  

Vitthal Jadhav

Others

अजाणतेपणी

अजाणतेपणी

1 min
475

घराजवळच्या पेरूच्या बागात

नकळत तू हट्ट करायचीस

'मला तो गाभूळा पेरू हवाय'

सरसर झाडावर चढण्यात

माहीर असलेला मी मग

कसलाच विचार न करता

तुझा आवडता पेरू आणायचो..

तर तू पुन्हा पोपटाने अर्धा

खाल्लेल्या पेरूचा हट्ट धरायचीस

माझ्या अजाणत्या वयात

तू इतकी जाणती कशी होतीस?

---

जावयाला नोकरी लागलं

याच आशेवर बापानं

द्यायला लावला ना

भरलेल्या पाण्याचा तांब्या

हातात त्यांच्या खरं सांग...

---

काल तुझ्या दारावरून जाताना

तुझा मुलगा मला हट्ट करत होता

घरी चला काका, चहा घेऊ...

तुही म्हणालीस ' पोराला आजोळाचं

कुणी दिसलं की आणतो चहाला..'

गरम चहा चर्र करत गेला

काळीज चिरत..

---

तुझ्या विरहात लिहीलेल्या कवितेस

पहिलं बक्षिस मिळालेलं

अजुनही जपून आहे माझ्याजवळ..

तू तर अजुनही पहिल्या सारखेच

जनावर सोडतेस चरायला माळरानावर..


Rate this content
Log in